Home विदर्भ घाटंजीत विविध ठिकाणी असलम कुरेशी यांचा वाढदिवस साजरा

घाटंजीत विविध ठिकाणी असलम कुरेशी यांचा वाढदिवस साजरा

245

यवतमाळ / घाटंजी- सर्व जाती धर्माच्या लोकासोबत सलोख्याचे संबंध जोपासून सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच दैनिक नवभारत चे तालुका प्रतिनिधी असलम कुरेशी यांचा दिनांक २४ ऑगस्ट रोज मंगळवार ला सर्वत्र समाजातील युवक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते तसेच घाटंजी तालुका पत्रकार संघा तर्फे विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
सामाजिक कार्यात राहून सदैव गरजावंनताच्या मदतीला धावून जाणारे, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असणारे अशी ख्याती असणारे व पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून अन्यायाला वाचा फोडणारे असलम कुरेशी यांचा वाढदिवस असल्याचे समजताच सर्वधर्मातील युवक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते तसेच घाटंजी तालुका पत्रकार संघा तर्फे वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम स्थानिक विश्राम गृहात पत्रकार संघाचे वतीने सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते यांचे वतीने मातोश्री हॉटेल मध्ये तर युवक वर्गाकडून सायंकाळी राजीव गांधी चौक, तहसिल चौक येथे त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात येवून त्यांचे कडून असेच सामाजिक कार्य होत रहावे अशी अपेक्षा बाळगत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमात घाटंजी तालुका पत्रकार संघाचे सर्वत्र पत्रकार बांधवासह नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश कुडेगावे, प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धांदे, सय्यद रफिक बाबु, मोरेश्वर वातीले, सुरेश अक्कलवार, अंकुश ठाकरे, निखील देठे, प्रदीप राठोड, संदीप जाधव, मराठे, पंकज राठोड, छबू भाई यांचे सह बहुसंख्येने त्यांचे हितचिंतक मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा कार्यकर्ते सय्यद सद्दाम यांनी अथक परिश्रम घेतले.