Home विदर्भ कृषीच्या विद्यार्थ्यांनी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

कृषीच्या विद्यार्थ्यांनी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

115

यवतमाळ  , (प्रतिनिधी ) –     यवतमाळ ग्रामीण कृषी कार्यनुभव या कार्यक्रमा अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी गणेश प्रल्हादराव हटवार यांनी तालुक्यातील हिवरी येथील शेतकऱ्यांना  शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. तालुक्यातील हिवरी गावात शेतकऱ्यांना माती परीक्षण ,चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया, फवारणी, जैविक औषधीची बीजप्रक्रिया करत विविध प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माती परीक्षण ,चारा प्रक्रिया, बीजप्रक्रिया ,फवारणी, करताना घ्यावयाची काळजी, गांडूळ खत निर्मिती शेतीक्षेत्रात ॲपचा वापर, एकात्मिक तण व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. प्रत्यक्षिकात रायझोबियम आणि ट्रायकोडरमा या औषधांच्या साह्याने बीजप्रक्रिया करत यासंबंधी सविस्तर या सर्व घटकांची माहिती देत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबर शेतीसंबंधी अन्य बाबी संदर्भात या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना सविस्तरपणे माहिती देऊन शेतकऱ्यांना आधुनिक दर्जेदार शेतीसाठी आवाहन केले.यावेळी गावातील बरेच शेतकरी उपस्थित होते . शेतकऱ्यांनी देखील मोठया कुतुहलाने माहिती जाणून घेतली.

या उपक्रमासाठी मारोतराव वादफळे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.ए. ठाकरे, उपप्राचार्य एम . व्ही कडू, कार्यक्रम अधिकारी शुभम सराफ, डॉ प्रतिक बोबडे, के. टी . ठाकरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले असून या यावेळी कृषीसहाय्यक मनीषा बालसराफ यांच्या सह गावातील शेतकरी शिवानंद ओमप्रकाश लोहीया , श्रीकृष्ण तटकरी , मनोज लोटीया व आदी शेतकरी व शेतमजुर उपस्थित होते. यावेळी हिवरी येथील ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या  संपन्न झाला .