Home मराठवाडा विरेगव्हाण तांडा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक बनलाय ‘ दिल का राजा ‘

विरेगव्हाण तांडा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक बनलाय ‘ दिल का राजा ‘

635

सांडपाणी रस्त्यावर,घरासमोर घाणीचे साम्राज्य; विरेगव्हाण तांड्यात रूग्णांच्या संख्येत वाढ,बालके तापेने फणफणले..!

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा हे दोन हजार लोकसंख्यचे गाव असून,दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने नालीअभावी प्रत्येकांच्या घरासमोर ठिकठिकाणी पाणी साचले असून याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.स्वच्छतेचे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे ग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे.मात्र याकडे ग्रामसेवक लक्ष द्यायला तयार नाही.ग्रामसेवकाची मनमानी वाढली आहे.ते कधी येतात आणि जातात हे कुणी ठामपणे सांगू शकत नाही.

गल्लीबोळात ठिकठिकाणी कचरा,व पाण्याचे डबके साचले असून,गटार नाल्या तूंबलेल्या आहेत.नागरीकांना रहदारी करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे नागरीकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.सध्या तांड्यात घाणीमुळे नागरिक विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत.डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व ताप,खोकला, सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी या आजाराने हैराण झाले आहेत.चिकनगुणीया परत आला की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे मात्र मोबाईल बंद करून सर्व व्यवस्थापनात संपूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे दिसत आहे.ग्रामपंचायतीची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था बनलेली आहे.गावातील व्यवस्थापन शून्य अनुभव असलेल्या ग्रामसेवकांमुळे गावाचे नाव संपूर्ण बदनाम होताना दिसत आहे.ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत असून वरीष्ठांनी याकडे लक्ष देउन साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.