Home महत्वाची बातमी अशी सासू नको गं बाई ???

अशी सासू नको गं बाई ???

559

 

सासूचे घाणेरडं कृत्य , 

अमीन शाह ,

आजच्या या अत्याधुनिक विज्ञान युगात जग मंगळावर वस्ती उभारण्याच्या तयारीत असतांना काही लोकं मात्र अद्यापही अठराव्या शतकातच असल्याचे पाहायला मिळत आहे . मुख्यतः महिला वर्ग . आज मुली मुलांपेक्षा सरस असतांना देखील जुन्या लोकांना मुलांचा मोह सुटत नाही . त्यांना वंश चालवण्यासाठी वंशाचा दिवाच हवा असतो . मग त्यासाठी त्या कुठल्याही पातळीवर जाण्यास तयार असतात . नात्याला लाजवेल असा प्रकार एका सासूने सुनेला करायला लावला आहे . सासूने सुनेला करायला लावलेल्या किळसवाण्या प्रकारामुळे सामान्य माणसाला देखील त्या सासूची चिढ आल्याशिवाय राहणार नाही . बीड जिल्ह्यातील आष्टी जळगाव येथील हे प्रकरण आहे . एका महिलेला तीन मुलं आहेत . या तिघांचे लग्न झाले आहे . पण एकही सुनेला मुलगा झाला नाही . वंश वाढवण्यासाठी वंशाचा दिवा ( मुलगा ) पाहिजे म्हणून या आईने आपल्या मुलांचे दोन दोन लग्न लावले आहेत . म्हणजे या सासूला सहा सुना आहेत . वंशाच्या दिव्यासाठी सासूने आपल्या २ ९ वर्षाच्या सुनेला भावाच्या पोरासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले . सुनेने या गोष्टीला विरोध केल्यानंतरही तिला जबरदस्तीने हे घृणीत कृत्य करायला लावले . सुनेने या घटनेनंतर आष्टी पोलिसात सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दाखल केली आहे . तिने सासू , सासरे आणि ईतर लोकांच्या विरोधात तक्रार करून तिच्यावर अत्याचार झाल्याचे म्हटले आहे . पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे .