Home महत्वाची बातमी एका वृद्धाने  मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास भर चौकात मारून टाकले

एका वृद्धाने  मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास भर चौकात मारून टाकले

43
0

वृद्धास अटक…

अमीन शाह

ठाणे , दि. २३ :- सतत मुलीला त्रास देत असल्याने त्रासलेल्या वयोवृद्ध बापाने एका तरुणाचा भर चौकात सपासप वार करून खून केल्याची घटना आज दुपारी बदलापूरमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

26 वर्षीय तरूण मुलीला त्रास देत असल्याने 67 वर्षीय पित्याने तरुणाचा शिवगंगा भागातील वर्दळीच्या सुरवळ चौकात भर दुपारी खून केला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने नातवाला शाळेत सोडले.
सचिन शिंदे (वय 26) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नामदेव कोइंडे ( वय-67) असे खून करणाऱ्या आरोपी पित्याचे नाव आहे. सचिन शिंदे हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. त्याच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तरी देखील तो मुलीला सतत त्रास देत होता. अखेर सततच्या त्रासाला वैतागून मुलीच्या वडिलांनी टोकाची भूमिका घेत सचिन शिंदे याचा भर रस्त्यात धारदार हत्याराने खून केला. सचिन शिंदे याचा खून केल्यानंतर आरोपी नामदेव कोइंडे हे आपल्या नातवाला सोडण्यासाठी शाळेत गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीला त्रास होत असल्याची तक्रार आरोपी पित्याने बदलापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वेळीच मृत सचिन शिंदे याच्यावर कारवाई केली असती तर वडिलांना हे कृत्य करण्याची वेळ आली नसती. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने सचिन शिंदे सारख्या टवाळखोरांची हिंम्मत वाढते. पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केली नसल्याने पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Unlimited Reseller Hosting