
मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट,दि : ९ :- किनवट दुर्गम आदिवासी तालुक्यचे भूमिपुत्र असलेले उत्तम कागणे यांनी तहसीलदार म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी तहसीलदार म्हणून डॉ मृणाल जाधव या नव्यानेच रुजू झालेले आहेत.

त्यांचा सत्कार किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संलग्नित इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात दिल्या.
याप्रसंगी बोलताना तहसीलदार मृणाल जाधव म्हणाल्या की मी या तालुक्यात नव्यानेच रुजू झाले असून लवकरच सर्व कामाची माहिती घेऊन कामाला गती गती देणार आहे. अनेक चांगल्या कार्यासाठी वेळोवेळी आपल्या मीडिया ही गरज भासणार आहे तेव्हा सहकार्य करण्याचे चे आवाहन केले.
किनवट तालुक्यातील कर्तव्यदक्ष व तरुण तडफदार सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. किर्तिकुमार पुजार यांनी अल्पावधीतच किनवट उपविभागांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवून जनतेची सेवा करीत आहेत.जागतिक करोना संकटकाळी किनवट तालुक्याला या रोगापासून वाचण्यासाठी अनेक उपक्रम राबवून जनतेची अव्याहतपणे सेवा करीत आहेत. आज 9 ऑगस्ट क्रांतिदिनी तसेच जागतिक आदिवासी दिवस प्रसंगी वाढदिवस आहे. त्याअनुषंगाने इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया किनवट च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव ,एमसीएन न्यूज रिपोर्टर शेख परवीन(सचिव),पत्रकार राजेश पाटील,सय्यद नदीम,गंगाधर कदम सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चौधरी उपस्थित होते.











































