Home मराठवाडा मोगली एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे पाच मुलींना विषबाधा

मोगली एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे पाच मुलींना विषबाधा

238

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

खेळता खेळता मोगली एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे विषबाधा झालेल्या पाच चिमुकल्या मुलींना जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घनसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथे सदरची घटना घडली आहे.

बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बाहेर खेळत असलेल्या स्वरा अमोल जाधव वय अडिच वर्षे, अनुष्का अमोल जाधव वय सहा वर्षे, अनुष्का दिगंबर मस्के वय पाच वर्ष,रोषणी बाबासाहेब मस्के वय चार वर्षे आणि तेजस्विनी बाबासाहेब मस्के वय सहा वर्षे या चिमुकल्या मुलींनी खेळता खेळता मोगली एरंडीच्या बिया खाल्ल्या काही वेळानंतर या मुलींना उलट्या झाल्या.सरपंच भाऊराव धोंडिबा मुके यांनी तातडीने या पाचही मुलींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले,त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.