Home विदर्भ बेरोजगारीला कंटाळून येवदा येथे एका तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बेरोजगारीला कंटाळून येवदा येथे एका तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

116

प्रतिनिधी निलेश किरडे

अमरावती / दर्यापुर -: तालुक्यातील येवदा येथे काल मध्यरात्रीच्या दरम्यान तरुण युवक त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना २ आगस्ट सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सदर युवक बेरोजगार असल्याने पुढील भवितव्याबाबत चिंता करीत असल्याचे नागरिक सांगत आहेत.दिनांक १ ऑगस्ट रात्री या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव सागर गणेश रोहनकर वय २७ वर्ष राहणार गांधीनगर येवदा येथील आहे. या युवकांच्या हाताला काम नव्हते, कोरोना सारख्या महामारी व आता तालुक्यामध्ये अतिवृष्टीचे संकट आहे त्यामुळे तरुण युवक वर्ग बेरोजगार झाल्याचे बोलले जाते आहे काल मध्यरात्री घरातील सर्व झोपलेले असताना सागरने गळफास लावला आत्महत्या केली आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या मागे त्याला आई-वडील नाही सागर हा घरातील मोठा मुलगा त्याचे दहावी पर्यंत शिक्षण झाले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या करिता कपडे इस्त्री करणे इलेक्ट्रिक कामे करणे अशी कामे करत होता एक बहीण लग्न झाले असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व शिक्षण घेत असणाऱ्या लहान भाऊ आहे सागरने घरातील खांबाला दोर बांधून त्याने आत्महत्या केली आज दिनांक २ ऑगस्टला सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याच्या लहान भावाला दिसली. त्याने आसपासच्या लोकांना बोलावले व पोलिसांना पाचारण केले व पोलिसांनी पंचनामा केला व प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र त्याआधीच मृत झाला होता पुढील तपास येवदा पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहे