Home जळगाव “साखळी उपोषणाचा २८ वा दिवस” , मॅगसेस पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांची...

“साखळी उपोषणाचा २८ वा दिवस” , मॅगसेस पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांची उपोषणाच्या ठिकाणी भेट व पठिम्बा…!

36
0

कुल जमाती व वहीदत ए इस्लामी तर्फे सक्रिय सहभाग….

शरीफ शेख

रावेर , दि. २२ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी मागील २८ दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे साखळी उपोषणाला जळगावकर नागरिक स्वच्छेने बसले असून २८ व्या दिवशी जळगाव येथील वहीदत ए इस्लामी व कुल जमाती कौन्सिल जळगाव या दोन संघटनांच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवून उपोषणा द्वारे सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

*मॅगसेस पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांची भेट*
मॅगसेस पुरस्कार विजेते, स्टॉक होम वॉटर प्राईस प्राप्त वॉटर मन ऑफ इंडिया ज्याला भारतात जलदुत किंवा पाणी वाला म्हणून ओळखले जाते अशा या महनीय व्यक्तिमत्व असलेले राजेंद्र सिंग यांनी उपोषणा ठिकाणी भेट देऊन सदरचे उपोषण आपण एका नैसर्गिक न्यायासाठी करीत असून त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आपल्यासोबत आहे. सदरचे नागरिकत्व कायदा व एन आर सी हा घटनाबाह्य असून त्यासाठी न्यायालया सोबतच आपणास रस्त्यावर यावेच लागेल व त्यासाठी जळगावकर मागील २८ दिवसापासून रस्त्यावर उतरलेले आहे हे बघून आनंद झाला व माझ्या शुभेच्छा आपल्या सोबतच आहे असे त्यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले.
जळगाव मुस्लिम मंच चे फारुक शेख यांनी त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करून त्यांचा परिचय उपस्थित उपोषनार्थीना करून देतात उपोषणस्थळी एकच आनंद झाला.
डॉक्टर राजेन्द्र सिंह यांनी आबे जमजम या मुस्लिम समाजातील पवित्र पाण्याविषयी व गंगेच्या पाण्याविषयी माहिती विशद करून गंगेचे पाणी अद्याप या सरकारला स्वच्छ करता येत नसल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिभाताई शिंदे यांनीसुद्धा राजेंद्रसिंग यांच्या या कार्याचा व त्यांनी प्रत्यक्ष उपोषण ठिकाणी येऊन पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी जळगाव मंच तर्फे मुफ़्ती अतीकउर रहमान, मुक्ती हारून नदवी, मुफ़्ती खालीद, मुफ़्ती अबुजर , सैयद चाँद, करीम सालार,डॉक्टर अमानुल्ला शाह, बशीर बुर्‍हानी, डॉक्टर जावेद शेख, रफिक पटणी, सलीम इनामदार, शाहिद सय्यद, अन्वर सिकलिगर, नईम शेख, मुजाहिद खान, हाफिज मोहम्मद रहिम, अकील पठाण, युसुफ शेख रुस्तम, इक्बाल वजीर, मुस्ताक साहिल, ताहेर शेख,डॉ रागिब,रउफ खान,आरिफ देशमुख,फारूक अहेलेकार,तय्यब इब्राहिम,अलफैज़ पटेल, डॉ वसी अहमद,अतीक शेख,विकार आजिज़ी, सौ शमीम पटनी,सौ समिना,सौ साजिदा खान,आदी उपस्थित होते.

*वहिदत ए इस्लामी व कुल जमाती चा सहभाग*
२८ व्या दिवसाचे उपोषण साठी जळगाव येथील वहीदत ए इस्लामी व कुल जमाती या दोन संघटनांनी उपोषणामध्ये ते सक्रिय सहभाग नोंदविला त्यांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना दोन वेगवेगळी निवेदने सादर केली.

*उपोषण पुढे चालू राहणार* सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर एक महिना ची तारीख देण्यात आल्यामुळे सदरचे उपोषण सुद्धा पुढे वाढवण्यात आले असून तोपर्यंत हा कायदा मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे जळगाव मुस्लिम मंच व संविधान बचाव कृती समितीमार्फत कळविण्यात आलेले आहे. उपोषण स्थळ व वेळ मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची नोंद घ्यावी असे आव्हान गफ्फार मालिक, करीम सालार,फारूक शेख,मुफ़्ती अतीक,मुफ़्ती हारून, अयाज़ अली,शरीफ शाह यांनी एका पत्रका द्वारे केली आहे.
*गुरुवारी शिरसोली येथील ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे*

Unlimited Reseller Hosting