Home महत्वाची बातमी देश सेवा पुर्ण करुन घरी आलेल्या माजी सैनिकांचे मित्र परिवार तथा समस्त...

देश सेवा पुर्ण करुन घरी आलेल्या माजी सैनिकांचे मित्र परिवार तथा समस्त अंढेरा वासीयाकडुंन जंगी स्वागत

789

प्रतिनिधी【रवि आण्णा जाधव】

देऊळगाव राजा :-गेल्या सतरा वर्षांपासून सैनिक म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथील सुपुञ लान्स नायक मेजर नितीन प्रकाश देशमुख हा सैनिक खात्यातुन ३१जुलै २०२१रोजी सेवानिवृत्त झाला.अखंड,अविरत, अहोरात्र देशाची सेवा करण्याचे भाग्य आई शालुबाई देशमुख व वडिल प्रकाश देशमुख यांच्या पोटी जन्मलेल्या नितीनला लाभले लहानपणापासून सैनिक खात्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अथक परिश्रम करणार्या नितीनला अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी सैनिक खात्यात भरती होण्याचे स्वप्न साकार झाले.आणि उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पॅरा रेजिमेंट मध्ये सैनिक म्हणून देश सेवा करण्याचे भाग्य लाभले.देश सेवा करत असताना घरदारसोडुन,आई-वडील,पत्नी सोनाली,मुलगा प्रणव,मुलगी प्रणाली या संपूर्ण कुटुंबाला सोडुन देशाची सेवा या भारत मातेच्या रक्षणासाठी या भारतमातेच्या सुपुत्रांने केली.
भारत मातेच्या रक्षणासाठी कित्येक जवानांनी आपल्या जिवाचे बलिदान दिले.देश सेवा करत असताना अनेकांनी हुतात्म्य लाभले.
अरुणाचल प्रदेश राज्यातील मंचुका येथील युनिट मधुन अवघ्या काही अंतरावरील चीन सिमेरेषेजवळील खडतर भागात देशसेवा पुर्ण करुन अखेर लान्स नायक मेजर नितीन प्रकाश देशमुख १आॕगस्ट २०२१ला सकाळी १०वाजता आपल्या गावी अंढेरा फाट्यावर आगमन होताच आई-वडील,पत्नी,मुलगा,मुलगी तसेच संपुर्ण मिञ परिवार व संमस्त गावकऱ्यांनी लान्स नायक मेजर नितीनचे जल्लोषात स्वागत केले.
वर्ग मिञ परिवाराने हार,फुगे व फुलांनी फोर व्हिलर सजवलेली होती. त्यात नितीनची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.आई-बहिनीनी संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढल्या होत्या.आई-बहिनी मेजर नितीनचे औक्षण करत होत्या.सगळीकडे “जय जवान जय किसान”, भारत माते की जय,!इन्कलांब जिंदाबाद,!जय हिंद!या घोषणेने परिसर दणाणला होतो.गावकरी सुध्दा कोरोनाचे नियम पाळत स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील श्री औन्ढेश्वर मंदीर येथे आई-वडील,पत्नी सोनाली हिने नितीन पुजन केले.तसेच मैञ परिवार व गावकऱ्यांनी लान्स नायक नितीन प्रकाश देशमुखचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी मिञ परिवार व समस्त गावकरी यांनी सामील झाले होते.

“देश सेवा करून जन्मभूमीत परत आल्या नंतर वर्ग मित्र,मिञ परिवार नातेवाईक व गावकरी यांच्या कडून झालेल्या सह हद्य भव्य सत्कार व सैनिका प्रती असलेली आत्मीयता याने भारावून गेलो. खरच आयुष्य सार्थकी लागल्याची भावना लान्स नायक मेजर नीतीन प्रकाश देशमुख यांनी वक्त केली.”!