
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
आज दि. 01 /08/ 2021 वार रविवार रोजी समर्थ सार्वजनिक वाचनालय कुं.पिंपळगाव.ता.घनसावंगी जि. जालना. येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ यांची पुण्यतिथी आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती हा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन वाचनालयाचे अध्यक्ष मा.श्री रवींंद्र तात्या तौर साहेब तर प्रमुख पाहुणे श्री विनोद कऱ्हाडे व ग्रंथपाल श्री हिंमतराव सोळंके हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्याविषयी अमुल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.नारायण ढवळे यांनी केले,तर आभार श्री.प्रकाश काजळे यांनी मानले. यावेळी वाचनालयातील वाचक सभासद व कर्मचारी उपस्थित होते.











































