Home जळगाव राष्ट्रीय मंसुरी पिंजारी समाजाच्या जळगाव जिल्हा सह-प्रभारी पदी इकबाल पिंजारी ऐनपुरकर नियुक्त

राष्ट्रीय मंसुरी पिंजारी समाजाच्या जळगाव जिल्हा सह-प्रभारी पदी इकबाल पिंजारी ऐनपुरकर नियुक्त

115

रावेर (शरीफ शेख)

राष्ट्रीय मंसुरी पिंजारी समाज संघटन (दिल्ली) च्या जळगाव जिल्हा सह प्रभारी पदी इकबाल पिंजारी ऐनपुरकर यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय मंसुरी पिंजारी समाज(RMS) संघठन दिल्ली यांची झालेल्या कॉन्फ्रेसिंग बैठकीद्वारे कार्यकारणी तयार करण्यात आली.त्यात राष्ट्रीय मंसुरी समाजाचे(दिल्ली) राष्ट्रीय अध्यक्ष माननीय यूनुस साहेब मंसुरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय जब्बार बलदार मंसुरी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय मंसुरी पिंजारी सामाजाच्या जळगाव जिल्हा सह-प्रभारी पदी इक़बाल गंभीर पिंजारी ऐनपुरकर यांची समाजानुमते निवड करण्यात आली. इक़बाल पिंजारी यांची समाजाप्रती असलेले प्रेम,धडपड जिद्द,व समाजकार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.तसेच ते पत्रकार सुद्धा आहेत दरम्यान त्यांना विविध राज्यातुन समाज पदाधिकारी कडुन तसेच परिसरातून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या देण्यात आल्या व त्यांनीही सर्व समाजाचे आभार मानले.