Home विदर्भ अथक परिश्रमाने दर्यापूर येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे ऑनलाईन जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव...

अथक परिश्रमाने दर्यापूर येथे आदिवासी कोळी महादेव जमातीचे ऑनलाईन जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव दाखल

228

निलेश किरडे – दर्यापुर 

अमरावती –  अनेक वर्षांपासून दर्यापूर येथील सेतु संचालक आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्राचे ऑनलाइन प्रस्ताव दाखल करून घेण्यास अनेक वर्षे टाळाटाळ करीत होते आज दि. 27/07/2021 दर्यापूर येथील सेतू संचालक, तसेच SDO कार्यालय दर्यापूर यांचे समवेत एक ते दीड तास रितसर नियमानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र ५ जुन २००३ अधिसुचना जाती जमाती चे व इतर मागासवर्गीय प्रमाण पत्र व पडताळणी अधिनियम २००० प्रमाणे सविस्तरपणे चर्चा करून आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्रासाठी 3 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले. आज पासुन दर्यापूर तालुक्यातील कोळी महादेव जमातीचे बांधवाना ऑनलाइन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. भविष्यात अनावश्यक अडवणूक होनार नाही
सदर प्रसंगी आदिवासी कोळी महादेव जमातीचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अरुणजी किरडे ,करतवाडी रेल्वे ,आदर्श शिक्षक श्री नंदकिशोर रायबोले गुरूजी, दर्यापूर,श्री.चंद्रकांत थोरात गुरूजी दर्यापूर,श्री.रूपेश खेडकर सर दर्यापूर श्री. यादवराव ठाकरे सर म्हैसपूर(ह.मु,सावंतवाडी) ,श्री. प्रकाश पाटील-फुकट आगर(ह.मु,सावंतवाडी),श्री. निलेश किरडे सामदा काशीपुर ,हे सदर प्रसंगी उपस्थित होते.