Home नांदेड सारखणी येथे श्रद्धा मोटार रिवायडींग चे दुकान फोडून 65 हजारांची चोरी.

सारखणी येथे श्रद्धा मोटार रिवायडींग चे दुकान फोडून 65 हजारांची चोरी.

316

मजहर शेख, नांदेड

तीन इलेक्ट्रिकल मोटार व 15 किलो वायरची चोरी

नांदेड/किनवट – किनवट तालुक्यातील सारखणी येथील भर चौकातील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर किनवट रोडवर असलेल्या श्रधा मोटार रिवायडींग चे दुकानाचे सेटर वाकून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील दोन सियाराय कंपनीचे मोटर व एक वरुणा कंपनीचे मोटार आणि 15 किलो वायर ची चोरी करून माल लंपास केल्याची घटना सारखनी येथे दि.27च्या मध्यरात्री घडल्याचे दिसून आले या घटनेमुळे बाजार मार्केटमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
येथील भर बाजारातील एसबीआय बँकेत समोरील असलेल्या श्रद्धा मोटार रिवायडींग च्या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यानी इलेक्ट्रिकल मोटर दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या त्या आणि 15 किलो वायर ही चोरी झाल्याची घटना दुकानदार सकाळी दुकानात आल्यानंतर समजली या घटनेची तक्रार गणपत रामा पेटकुले यांनी सिंदखेड पोलीस स्टेशन येथे दिल्यानंतर लगेच सिंदखेड पोलिसांनी घटनेची पाहणी करुन माहिती घेतली ही घटना दिनांक 27 च्या मध्यरात्री झाली असावे असा अंदाज व्यक्त होत आहे चोरट्यांनी चार चाकी वाहनाचा वापर केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे .