
शासनाचे निर्देश पाळुन शहरात काढली रॅली, रुग्णांना केले फळ वाटप
इकबाल शेख
आर्वी,दि.२७:- शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिना निमीत्त शासनाच्या निर्देशाचे पालन करुन शहरामधून रॅल काढण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन उप जिल्हा रुग्णालायातील रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या निर्देशानुसार, वर्धा जिल्हा प्रमुख प्रशांत उर्फ बाळासाहेब शहागडकर यांच्या मार्गदर्शनात उप जिल्हा प्रमुख दशरथ जाधव व वर्धा जिल्ह्याच्या महिला संघटीका सवीता पुरी यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२७) सकाळी दहा वाजाताचे सुमारास येथील शिवसेना कार्यालयातुन गांधी चौक मार्गे शिवाजी चौकात हि रॅली पोहचली येथे छत्रीपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. मोहन सुटे व शिवेसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णांना फळ व बिस्कीटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. नंदकिशोर कोल्हे, डॉ. अशिष सोनी, माजी नगरसेवक अनिल पिंपळे, माजी नगरसेवक मुर्ली पवार, गुड्डु गावंडे, बाळु देशपांडे, अशोक गभणे, चिंदुजी झामरे, दिपक लोखंडे, रशीद खाँ पठाण, मनोज गुल्हाणे, मारेश्वर सुकळकर, बाबाराव मांडवकर, महादेवराव फळके, पदमाकर दवीले, अंबादास आसोले, नामदेव राठोड, प्रकाश खांडेकर, मनीष अरसड, प्रकाश झामरे, दिपक वाकोडकर, श्याम पोकळे, अमोल राहण, शशी हुसंगे, पवण ढोले, जयु ढोले, सर्वेश देशपांडे, बाळु वानखेडे, सारंग थीगळे, मनोज बोडखे, गौरव देशमुख, प्रशांत जाऊरकर, पंकज पात्रे, अशोक पाल, राजाभाऊ मडवे, सौ. निमाबाई मडवे, दुर्गाबाई तिवाडे, शाहीस्ता शेख, विमलताई अवलकार, लिलाबाई मोकरकर, चंद्रकलाबाई झामरे, बेबी नागापुरे, बेबीबाई कालोकार आदि सहभागी झाले होते.










































