
मजहर शेख, नांदेड
माहुर शहरात धुडगूस घालणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करा …!
नांदेड/माहूर,दि : २६ :- माहूर शहरात गेल्या पंधरा ते २० दिवसांपासून जंगलातून गावात शिरलेल्या तीन माकडांनी उच्छाद मांडला असून नागरिकांना चावे घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे नागरिकामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सदर माकडे अनेक नागरीकावर हल्ला करत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. तेव्हा वनविभागाने दोन दिवसात शहरात धुडगूस घालत असलेल्या माकडांचा बंदोबस्त करावा अन्यथा माहूरच्या वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.











































