Home जळगाव वरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण

वरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण

309

लियाकत शहा 

भुसावळ : तालुक्‍यातील वरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहत मधील क्वाटर ४८ टाईप टू मध्ये राहणाऱ्या महिलेस घराच्या शेजारी राहणाऱ्या पती -पत्नीने मारहाण करून दम दाटी केली याबाबत सदर महिला वरणगांव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेली असता कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांने तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अधिक माहिती अशी की तक्रारदार सौ. शेजल मनीष इंदिश वय ३६ राहणार वरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहत मधील क्वाटर ४८ टाईप टू यांनी दिलेल्या रोजी दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास तक्रारदार घरी एकटी मोबाईलवर असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे ऐकत होते. त्या वेळेस शरद चव्हाण हा येऊन बोल्ला याचे गाणे बंद कर याने काय केले आहे याचे गाणे का ऐकते त्यावर तक्रारदार यांनी गाणे बंद न केल्याने चव्हाण यांनी मोबाईल फोडला व घरातून बाहेर काढून जातीवाचक शिव्या देऊन शरद चव्हान व त्यांची पत्नी त्यासर्वानी मिळून मारहाण केली. असे तक्रारदरानी सांगितले.