Home विदर्भ इंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल...

इंटरनेट बैंकिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या आरोपीस खगडिया (बिहार) येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश

169

इकबाल शेख 

वर्धा – फिर्यादी श्री बंडू हुडे, रा. वायगाव, ता. जि. वर्धा यांनी, त्यांना फ़ोनद्वारे आपण ऑनलाईन बोलावलेल्या सैंडलवर लकी ड्रॉ मध्ये महिंद्रा कंपनीची XUV लागली असल्याचे सांगुन फ़िर्यादीला विश्वासात घेवुन फिर्यादी यांचे बैंक खात्याची माहीती घेवुन फिर्यादी यांचे बैंक खात्यावर इंटरनेट बैंकिंग ऐक्टिव करुन फ़िर्यादी यांची एकुण १४,१७९६४/- रु. आर्थिक फसवणुक केली. फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन देवळी येथे दिलेल्या रिपोर्टवरून दिनांक २८-०१-२०२१ रोजी अप क्र. ११६/२०२१ कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (ड) आय.टी. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच फिर्यादी श्रीमती वर्षा कंडमबेथ, रा. सावंगी (मेघे) वर्धा यांना अज्ञात इसमाने फोनद्वारे क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याचे आमिष दाखवून ओटीपी मागवून त्यांची एकूण १,६७,०००/- रु, आर्थिक फसवणूक केल्याने पोलीस पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) येथे दाखल अप.क्र. ७७/२०२१ कलम ४२० भादंवि. ६६ (डी) आय.टी.अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक माहिती काढण्यात आली व मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे बिहार राज्यातील निष्पन्न झाल्याने पथक तयार करून बिहार येथे पाठविण्यात आले होते. पोलीस स्टेशन, देवळी अप.क्र. ११६/२०२१ मधील आरोपी हर्षत पशुपती सिंग, वय २७ वर्ष, रा. खगडिया यास खगडिया राज्य बिहार येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
तसेच पोलीस स्टेशन सावंगी (मेघे) अप.क्र. ७७/२०२१ या गुन्ह्यातील आरोपी अशोक कुमार पुना रविदास, रा, कोचरा, जिल्हा नालंदा, राज्य बिहार यास हुलासगंज, जिल्हा जहानाबाद येथून ताब्यात घेतले. परंतु सदर आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्यास सीआरपीसी कलम ४१ (१)(बी) प्रमाणे सूचनापत्र देण्यात आले. असे वर नमूद दोन्ही गुन्हे उघडकीस आणले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. मोहन धोंगडे, पोलीस स्टेशन सावंगी (मेघे), सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनी. गोपाल ढोले, पोउपनी. सौरभ घरडे, पोलीस अंमलदार निलेश कट्टोजवार, अनुप कावळे, अंकित जीभे, सायबर शाखा, अमरदीप वाढवे, आकाश कसर, पो.स्टे. देवळी, प्रकाश खरडे, पो.स्टे. सावंगी (मेघे) व सायबर पथक यांनी केली.