Home विदर्भ राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

376

यवतमाळ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यवतमाळ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाकड़ून विविध सामाजिक उपक्रम राबविन्यात आले. यानिमित्ताने प्रयासवन येथे वृक्षारोपण, रुग्णांना बिस्किट,वाटप,वृद्धाश्रमात किराना किट,मेडिसिन वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमाना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मो.तारिक़ साहिर लोखंडवाला,प्रदेश राष्ट्रवादीचे पदाधिकारी वसंतराव घुइखेड़कर,क्रांति राऊत यांचा सहयोग लाभला. 22 जुलै रोजी प्रयासवन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.येथे विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मो.तारिक़ साहिर लोखंडवाला,प्रदेश राष्ट्रवादीचे पदाधिकारी वसंतराव घुइखेड़कर,क्रांति राऊत व कार्यकर्त्यांनी याप्रसंगी वृक्षारोपण केले, यावेळी यवतमाळ सर्कलचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृध्दाश्रम,निळोणा येथे गरजु असहाय वृद्धाना जीवनावश्यक वस्तू व मेडीसीन वाटप करण्यात आले.या प्रसंगी स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रूग्णालय यवतमाळ येथे रुगनाना फळ,बिस्कीट,वाटप करण्यात आले,याच दिवशी बाबुलगाव मध्ये राष्ट्रवादी कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले,यामध्ये उपस्थिति म्हणून मो. तारिक साहिर लोखंडवाला व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सर्व सामाजिक उपक्रमामध्ये यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तारिक लोखंडवाला, प्रदेश राष्ट्रवादीचे पदाधिकारी वसन्त घुइखेड़कर,क्रांति राऊत, लालजी राऊत,उत्तम गुलहाने,सतीश मानधना,हरीश कूड़े, नयन लूंगे, योगेश धानोरकर मनीष आड़े,सज्जाद अली सय्यद वाहेद श्रीकांत माकोडे जमीर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सामील झाले.


51 युवकांचा देहदानाचा संकल्प
राष्ट्रवादी चे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यवतमाळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 51 युवकांनी सामाजिक योगदान म्हणून मृत्यु नन्तर आपला देहदान करण्याचा संकल्प केला.22 जुलै रोजी या युवकानी देहदान करण्याचे 51 फॉर्म भरून
राष्ट्रवादी नेते पदाधिकारिंच्या उपस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना देहदान संकल्प फार्म सुपुर्द केले.