Home विदर्भ ग्रामीण रुग्णालयात समस्या सोडविण्यासाठी विविध संघटनेच्या वतिने शासनाला दिले निवेदन.!

ग्रामीण रुग्णालयात समस्या सोडविण्यासाठी विविध संघटनेच्या वतिने शासनाला दिले निवेदन.!

33
0

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २२ :- जिल्ह्यातील कारंजा (घाडगे),येथील ग्रामीण रुग्णालयाचे ( 30 खाटा चे ) रूपांतरण ( 50 खाटा चे उपजिल्हा रुग्णालयामध्ये ) श्रेणी वर्धित करण्यात यावे व रिक्त असलेली पदे त्वरित भरण्यात यावी, आरोग्य सेवा सुविधांमध्ये सुधारणा करण्यात यावीआणि इतर मागण्या करिता “कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती” चे वतीने ,गुरुदेव सेवा मंडळ ,संत गजानन महाराज संस्थान मंडळ, अवतार मेहेरबाबा अध्यात्मिक केंद्र , संवेदना युवा मंच, मराठा सेवा संघ , बुद्धिष्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन,संभाजी ब्रिगेड शाखा , भ्रष्टाचार निर्मूलन समिती ,राष्ट्रीय मुस्लीम सेवा संघ , वि ठ्ठल टेकडी sporting club karanja ,पत्रकार प्रतिनिधी ,इतर वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था ,संघटना, मंडळ, मंच व वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजसेवी नागरिकांनी मा. तहसीलदार कारंजा (घा ) यांच्यामार्फत मा .सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन ला निवेदन सादर केलेले आहे.
व निवेदनाद्वारे ट्रा मा केअर युनिट,अपुरे मनुष्यबळ, रुग्णवाहिका, x- ray मशीन व इतर अपुऱ्या सोई सुविधा यामध्ये शासनाने ताबडतोब सुधारणा करावी अन्यथा जनआंदोलन चा मार्ग पत्कराला जाऊ शकतो अशी हाक या निवेदन द्वारे समितीमार्फत वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था , मंडळ , संघटना , मंच नागरिकांनी दिली आहे.

Unlimited Reseller Hosting