Home मराठवाडा मैत्रेय परतावा संदर्भात कायदेशीर लढ्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड.प्रविण चव्हाण यांची नियुक्ती...

मैत्रेय परतावा संदर्भात कायदेशीर लढ्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड.प्रविण चव्हाण यांची नियुक्ती करण्याची मागणी

1002

लक्ष्मण बिलोरे- जालना

मैत्रेय उद्योग परिवारातील ठेवीदारांचे परतावे मिळणे बाबत जलदगतीने कायदेशीर लढ्यासाठी विशेष सरकारी वकिल म्हणून अॅड.प्रविण पंडीत चव्हाण जळगावकर यांची नियुक्ती करण्याची मागणी आज आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर डाॅ.जी.एन.हरपनहळ्ळी, यासीन सय्यद, निलीमा कुष्टे, लक्ष्मण लाटवडे,यांची नावे आहेत यावेळी या प्रतिनिधींनी भेट घेऊन चर्चा केली.
मैत्रेय प्रकरणाला विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.प्रवीण पंडित चव्हाण यांच्या नियुक्ती बाबत शिफारस पत्र दिले. गृहमंत्री नामदार दिलीप वळसे-पाटील यांच्याबरोबर चर्चा करण्याबाबत अश्वासन दिले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर यांचे सहकार्य लाभले.