Home विदर्भ रेडीयंट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते “मुख्यमंत्री...

रेडीयंट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे मा.मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा” ऑनलाईन पद्धतीने उदघाटन सोहळा संप्पन्न.

520

मनिष गुडधे

अमरावती- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे . त्यामुळे रूग्णालयांमध्ये उपलब्ध असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करावे याकरिता जिल्ह्यामध्ये सन 2021 साठी ‘ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ‘ राबविण्यात येत आहे . या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

हेल्थकेअर , मेडिकल व नर्सिंग तसेच
डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हयात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत ” मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास सदर शासननिर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे . त्याअनुषंगाने रेडियन्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे काल दिनांक ०८/०७/२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत ” मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ” या योजनेचा डिजीटल शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्रीउद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हस्ते करण्यात आला. या योजने अंतर्गत जनरल ड्युटी असिस्टंट ऍडव्हान्स कोर्स चे कौशल्य प्रशिक्षण देण्यास काल पासून सुरुवात करण्यात आली. या कोर्स करिता 30 विध्यार्थ्यांची तुकडी ऍप्रॉन, ओळखपत्र, मास्क, सॅनिटायजर, आदी बाबींसह सज्ज होती. श्री.शैलेश नवाल , जिल्हाधिकारी , अमरावती यांनी रेडीयन्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , अमरावती येथे भेट दिली व उमेदवारांशी संवाद साधतांना प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण करावे व आपल्या रोजगार क्षमतेत वाढ करावी जेणेकरुन प्रशिक्षणानंतर आपल्याला रोजगार प्राप्त होऊ शकतो असे सुचित केले सदर भेटीमध्ये जिल्हाधिकारी , अमरावती यांचे हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना ( Induction Kit ) वाटप करण्यात आल्या . सदर कार्यक्रम प्रसंगी राहुल कुकलकर यांनी सूत्रसंचालन केले, श्री.प्रफुल्ल शेळके , सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अमरावती , यांनी प्रास्ताविक केले व तदनंतर श्री. डॉ. श्यामसुंदर निकम , जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा सामान्य रुग्णालय , अमरावती , श्री.सुनिल काळबांडे , उप – आयुक्त , कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता , विभागीय आयुक्तालय , अमरावती यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले . उदघाटन प्रसंगी कार्यक्रमास जिल्हाधिकारी , अमरावती , जिल्हा शल्य चिकित्सक , अमरावती , उप आयुक्त , कौशल्य विकास विभाग , अमरावती , सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अमरावती आणि रेडीयंन्ट हॉस्पिटल , अमरावतीचे संचालक तथा जनरल ड्युटी असिस्टंट ऍडव्हान्स कोर्स चे समन्वयक डॉ माधुरी अग्रवाल, संचालक डॉ.आनंद काकाणी, डॉ. पवन अग्रवाल, डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ सीमा अडवाणी, डॉ अनुराधा काकाणी, ओजस चारिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री सुभाषचंद्रजी अग्रवाल सह इतर मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांन बरोबर जनरल ड्युटी असिस्टंट ऍडव्हान्स कोर्सच्या विद्याथ्यांनी हा ऑनलाईन उदघाटन सोहळा जॉईन केला. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. माधुरी अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेकरीता कौशल्य विकास विभाग व समन्वयक डॉ माधुरी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल राठोड, पवन इंगोले, सारंग लकडे, शुभांगी अलेक्झांडर, हरिष कुकलकर यांनी अथक परिश्रम घेतले .