Home सातारा डॉ.उर्मिला येळगावकर यांची सातारा जिल्हा जीवनावश्यक वस्तू दक्षता कमिटीवर निवड

डॉ.उर्मिला येळगावकर यांची सातारा जिल्हा जीवनावश्यक वस्तू दक्षता कमिटीवर निवड

288

मायणी : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत वितरण करणेत येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवणेसाठी दक्षता समिती गठीत केलेली आहे . त्या दक्षता समितीवर डॉ.उर्मिला दिलीपराव येळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
डॉ.उर्मिला येळगावकर यांचे अनेक क्षेत्रांतील कार्याची दखल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखरसिंह, स्नेहा किसवे यांनी त्यांची सातारा जिल्हा जीवनावश्यक वस्तू दक्ष समितीवर निवड केली .
त्यांनी वैद्यकिय सेवा देताना सामाजिक बांधीलकीही जोपासली आहे . ग्राहक पंचायतीच्या खटाव तालुका अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला . तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाने महिला रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.डॉ.सौ.येळगावकर यांच्या कार्याबद्दल विभागातील विविध सामाजिक संघटनांनी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरव केला आहे .त्यांच्या सामाजिक कार्याचा लाभ निश्चितच विभागातील सर्वांना होईल . या नियुक्तीबद्दल डॉ सौ . उर्मिला येळगावकर यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखरसिंह, व स्नेहा किसवे यांचे विशेष आभार मानले .
सौ.येळगावकर यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.