Home विदर्भ घरकुल निधी व पट्टे वाटपासाठी भाजप चे आंदोलन , “नगर पंचायत आष्टी...

घरकुल निधी व पट्टे वाटपासाठी भाजप चे आंदोलन , “नगर पंचायत आष्टी समोर उपोषण”

153

रविंद्र साखरे – आष्टी

वर्धा – सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपंचायत आष्टी तील २६७ घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान २० महिन्यापासून न दिल्याने तसेच शासकीय जागेवर वसलेल्या बेघर नागरिकांचे जागेची मागणी करूनही त्यांना पट्टे वाटप न केल्याने भाजपच्या वतीने येत्या ०८ जुलैला नगरपंचायत कार्यालयासमोर नागरिकांना घेऊन आज लाक्षणिक उपोषण करती आहे

भाजपचे माजी गटनेते तथा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव अशोक विजयकर , माजी नगरसेवक मनिष ठोंबरे ,सुरेश काळपांडे ,संजय दारोकर यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना तहसीलदार आष्टी , मुख्याधिकारी नगरपंचायत आष्टी यांचेमार्फत दिनांक ०२ जुलैला निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायत आष्टीला २६७ घरकुलाचा पहिला डी पी आर २०१८ ला मंजूर झाला तर २५/०२/२०१९ला ४४९ घरकुल च्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली पहिल्या टप्प्याचे २०१९ मध्ये २.६७ कोटी रुपये नगरपंचायत आष्टी ला प्राप्त झाले होते नगरपंचायत दृष्टीने या टप्प्यातील २२२ लाभार्थ्यांना २.५ लक्ष रुपये पैकी ०१ लक्ष रुपयाचे अनुदान दिले तसेच उर्वरित १.५ लक्ष रुपयाचे अनुदान वीस महिन्यापासून दिले गेले नाही अनेक लाभार्थी पदरमोड करून उसनवारीने पैसे आणून उधारीवर बांधकाम साहित्य घेऊन घराचे बांधकाम स्लॅप लेव्हल परंतु उचलले आज मिळेल उद्या मिळेल या आशेपोटी गेल्या वीस महिन्यापासून तू प्रतीक्षा करतो आहे परंतु नगरपंचायत प्रशासन निधी आला नसल्याने कधी अभियंता पद रिक्त असल्याने तर कधी कोविड-१९ चे कारण देत थापा देत राहिल्याने बांधकाम लाभार्थी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या खचला आहे.

भाजपचे माजी गटनेते अशोक विजयकर शहराध्यक्ष मनिष ठोंबरे यांनी याबाबत सांगितले की लाभार्थ्यांचे अनुदान मिळावे आणि इंदिरानगर व गणेशपुर बेकारांना पट्टे मिळावे याकरिता दिनांक २० ऑक्टोंबर २०२० ला आमदार दादाराव केचे यांचे नेतृत्वात तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना निवेदन देण्यात आले होते तसेच वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला पण कारणे देत वेळकाढू धोरण अवलंबले गेले.या सर्व गोष्टी विचारात घेऊन आज लाक्षणिक उपोषण भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते करीत आहे