
प्रतिनिधी – धनराज खर्चान
अमरावती / भातकुली- मंगळवारी ६ जुलै भातकुली तहसील कार्यालयातील नायब तहसिलदाराना २८ वर्षीय दीपा त्र्यंबक डोंगरदिवे या महिलेने कार्यालयात जाऊन शिवीगाळ व मारहाण केली.या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली. भातकुली तहसील अंतर्गत येणाऱ्या निंभा(नारायणपूर) येथील एका २८ वर्षीय महिलेकडे सरकारी स्वस्त धन्याचे दुकान आहे या धान्य दुकानात नव्याने काही अतिरिक्त कार्ड जोडण्यासाठी या महिलेने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयात अर्ज केला आहे मात्र अजूनही हे कार्ड या महिलेच्या धान्य दुकानात जोडण्यात आले नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हि महिला नेहमी प्रमाणे तहसील कार्यालयात पोहचली.आज ही काम झाले नाही पाहून ती नायब तहसीलदाराकडे विचारणा करण्याकरितां गेली व त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.वारंवार चकर मारूनही काम पूर्ण होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने नायब तहसीलदार यांना मारहाण सुरु केली.इतक्यात ती महिला थांबली नाही तर त्यांना धमकी सुद्धा दिली .असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले.










































