Home मुंबई संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन – सुरेश वाघमारे

संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन – सुरेश वाघमारे

744

मुंबई , (  प्रतिनिधी ) –  चितोडा खामगाव बुलडाणा येथील प्रकरणी जातीय द्वेष पेरणारे बेताल वक्तव्य एका विधानसभा सदस्यला न शोभणारे असून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाड वर कठोर कारवाई करत त्याचें विधानसभा सदस्य पद तात्काळ रद्द करा अन्यथा उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने ऍड भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशाने उत्तर मुंबईत ठीक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी दिला असून याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपले मौन व्रत सोडावे व जातीय वाद निर्माण करणाऱ्या आमदाराला पाठीशी न घालता शिवसेनेतून आमदार संजय गायकवाड यांची हकालपट्टी करून नैतिकता जपावी अशी मागणी आजाद समाज पार्टी उत्तरं मुंबई जिल्ह्याच्या वतीने वाघमारे हे करीत असून ठाकरे सरकारने या प्रकरणी गांभीर्य जपावे अन्यथा उत्तरं मुंबई वेळप्रसंगी रास्ता रोको सुद्धा करण्यात येईल उदभवणाऱ्या परिस्थीला ठाकरे सरकार सर्वस्वी जबाबदार असेल चितोडा येथील पीडित कुटूंबाला व येथील समाज बांधवाना थोडासा जरी त्रास झाला व दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविले आणि संबंधित पोलीस अधिकारी शेख व गाडेकर यांच्यावर दबाव आणल्यास आम्ही ते कदापिही सहन करणार नाही आम्हाला पुन्हा भीमा कोरेगाव करायला भाग पाडू  नका असा सज्जड दम वजा इशारा सुरेश वाघमारे यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिला आहे.