Home विदर्भ आर्वी पोलिसांनी पाच वर्षाच्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मुलीला आईच्या स्वाधीन केले.

आर्वी पोलिसांनी पाच वर्षाच्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन मुलीला आईच्या स्वाधीन केले.

186

रवींद्र साखरे

वर्धा – आर्वी पुलगाव रोड वरील खुबगाव येथून आर्वी पोलीस स्टेशनला फोन आला की चार ते पाच वर्षाची मुलगीही एकटीच खूबगाव येथील बस स्टँड वर मिळून आली आर्वी पोलिसांनी तिथे पोचून तिला तिचे नाव गाव विचारले असता तिच्याबद्दल काहीच माहिती सांगत नसल्याने त्या मुलीच्या नातेवाइकांचा शोध घेण्याकरिता पोलीस निरीक्षक – संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार अमोल बरडे, नापोका – सुनील मळनकर , महिला सैनिक शुभांगी भगत कौशिक गोंधळी यांनी आर्वी पोलीस स्टेशन पर्यंत परिसरात कसून शोध घेतला असता पंचवटी आर्वी येथे तिची मावशी सौ प्रमिला वरखडे ही राहत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली प्रमिला वरखडे यांना विचारले असता हे मुलगी माझी बहीण लेख असल्याचे त्यांनी सांगितले व तिचे आईचे नाव निर्मला परतेकी राहणार कर्माबाद यांचे बद्दल माहिती मिळाल्याने त्यांना आर्वी पोलीस स्टेशन मध्ये बोलावून सदर मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यात आले.