
मजहर शेख, नांदेड
नांदेड/सारखणी,दि : २५:- सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील अनेक वर्षापासून बेवारस पडलेल्या सहा वाहनाचा येत्या 29 जुन रोजी तालुका दंडाधिकारी माहूर यांच्या आदेशाने जाहीर लिलाव पोलिस स्टेशन सिंदखेड येथे करण्यात येणार आहे असे आव्हान सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे.
बेवारस वाहनाची ओळख पटवून देऊन घेऊन जावे असे आवाहन वेळोवेळी सिंदखेड पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले होते. तरी पण मोटार सायकल वाहन मालक कोणीही पुढे आलेला नाही सदरील आशा मोटारसायकल चा लिलाव तालुका दंडाधिकारी माहूर यांच्या आदेशाने लिलाव करण्यात येणार आहे यामध्ये एकूण सहा मोटारसायकलीत हिरो होंडा चार व सुझुकी दोन मोटर सायकल चा लिलाव करण्यात येणार आहे.
सदरील लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीने दिनांक 29 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशन सिंदखेड येथे यावे असे आव्हान सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे.











































