
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्य़ातील चोपड़ा येथील कॅन्सरग्रस्त रुग्नणसाठी देवदूत ठरलेल्या राज मोहम्मद खान शिकलगर यांचा सेवाभावी कार्याची दखल घेत सत्यशोधक चळवळीतील सुप्रसिद्ध लेखिका तमन्ना इनामदार,पुणे यांच्या रिवायत या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. या पुस्तकामध्ये धर्माच्या ठराविक व्याख्येच्या परिघातून बाहेर पडून वैश्विक प्रेम,सद्भावनेचा जागर करत माणसांच्या सुखासाठी, उन्नतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या लोकांचा जीवनप्रवास दिला आहे.
या मालिकेत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपड़ा शहरात राहनारे कैंसर जनजागृति अभियान व व्यसनमुक्त अभियान व कॅन्सर ग्रस्त साठी आपले आयुष्य समर्पित करणारे कॅन्सर ग्रस्त राज मोहम्मद खान शिकलगर यांचा जीवनशैलीचा व समाज सेवे बद्दल प्रवासाचा समावेश केला आहे.











































