Home विदर्भ ठरलेल्या वेळा पेक्षा कमी वेळात 1000 मीटर वेगवान धावून इतिहास रचला आर्या...

ठरलेल्या वेळा पेक्षा कमी वेळात 1000 मीटर वेगवान धावून इतिहास रचला आर्या टकोने ने 6 मिनटं 1 सेकंदात 1000 मीटर अंतर धावून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड वर नाव नोंदविले

400

ईकबाल शेख

वर्धा – 3वर्ष 7 महिण्याची आर्या पंकज टाकोने ने आज वर्धा गांधी पुतळ्या पासून तर अँटनी स्कूल पर्यत 1000 मीटर अंतर 6 मिनटं 1 सेकंदात धावून विश्व किर्तीमान नोंदवून आज फादर डे ला आपल्या वडिलाला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड चा गिफ्ट दिला।

आर्य टाकोने ला 1000 मीटर अंतर कापणया साठी 7 मिनटं एशिया बुक रेकॉर्ड कडून व 8 मिनटं इंडिया बुक रेकॉर्ड कडून वेळ देण्यात आला होता मात्र 6 मिनटं व 1 सेकंदात त्याने हा गंतव्य गाठून एक नवीन इतिहास रचून पुलगाव कारांची मान उंचावली

सकाळी 7 वाजता ही वेगवान धाव सुरु झाली त्यावेळी जिल्ह्यातील खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे व अँटनी शाळे तील अनेक मान्यवरांनी त्याचे मनोबल वाढवत त्याला चिर्स उप केले व रेकॉर्ड मध्ये नोंद होताच त्याचा वर अभिनंदन चा वर्षाव सुरू झाला। आर्या चे वडील स्वतः हे व्हॉलीबॉल चे राष्ट्रीय खेडाळू असून पुलगाव पोलीस विभागात कार्यरत आहे या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पंकज टाकोने ने आर्या ही ऑलम्पिक चॅम्पियन मध्ये देशाचा नावलौकिक करावा अशी सदिच्छा जाहीर केली
या रेकॉर्ड ची घोषणा मनोज तत्ववादी यांनी केली.