Home मराठवाडा बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित करा-सुरेश काळे

बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित करा-सुरेश काळे

315

बँकेच्या मुजोर कर्मचाऱ्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,असे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिले आहे.
भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेच्या मॅनेजरसह बँकेतील क्षेत्र अधिकारी आणि शिपायांनी पीककर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे.ही घटना (ता.१७) जून गुरुवार रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.दत्तू शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याच नाव असून ते भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्र्वर येथील रहिवासी आहे.
याविषयी निवेदनाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पिककर्ज काढण्यासाठी हा शेतकरी उभा असताना शिपायाने बँकेचे गेट बंद केलं आणि आता वेळ संपली उद्या या असं सांगितलं.यावरून या शेतकऱ्याने मॅनेजरकडे पीककर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नोकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली.यावेळी शिपाई आणी बँकेतील क्षेत्र अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याला करत बेदम मारहाण केली.
या बँकेच्या शाखेत दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे.दलालांच्या माध्यमातून कोणतेही कर्ज प्रकरण लवकर होते तर जे शेतकरी दलालांकडे कर्ज प्रकरण देत नाहीत त्यांना. कित्येक महिने बँकेच्या खेट्या माराव्या लागतात.या बँकेतील क्षेत्र अधिकारी इम्रान पठाण यांची याविषयी विभागीय चौकशी करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्या मॅनेजरसह क्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. या सर्वांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या शेतकऱ्यास न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असा इशारा उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिला आहे.