Home मराठवाडा नुसती शाबासकी नको…वेतन द्या…!

नुसती शाबासकी नको…वेतन द्या…!

476

प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य विभागातील आशा व गट प्रवर्तक जाणार १५ जून पासून संपावर

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

वारंवार निवेदने देऊन ही मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी प्रलंबित मागण्याची दखल न घेतल्याने नाईलाजास्तव अखेर राज्यातील आशा गटप्रवर्तक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तक आपले काम बंद करणार आहेत.या संपात जालना जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकही सिटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड गोविंद आर्दड यांच्या नेतृत्वाखाली संपात सहभागी होणार आहेत.

कोविड महामारीच्या काळात आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून अगदी गाव, वस्ती,मोहल्ला पातळीवर कोविड रुग्णांचा सर्वे आणि लसीकरणाची प्रत्यक्ष फिल्ड वरचे काम आशा गट प्रवर्तक करतात.मात्र त्यांना या कामाचा मोबदला महिन्याला १ हजार म्हणजे दिवसाला ३३ रुपये असा मिळतो.हा मोबदलाही केंद्र सरकारचा मिळतो राज्य सरकारचा एक रुपयाही दिला जात नाही.त्यात त्यांना कुठलीही सुरक्षा साधनेही या १ वर्षाच्या काळात दिलेली नाहीत.काम नाही केले तर काढून टाकण्याची धमकी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी देतात आशा प्रकारे दबाव तंत्र आणि वेठबिगारी आरोग्य विभागाची चालली आहे.सिटू संघटना च्या वतीने राज्य पातळीवर अनेक वेळा आरोग्य मंत्री आणि मुख्य मंत्र्यांना कोविड कामकाजासाठी इतर कर्मचाऱ्यां प्रमाणे आशांना प्रति दिन ३०० व गट प्रवर्तकाना किमान ५०० रु भत्ता देण्यात यावा अशी मागणी केली पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.
तिसरी लाट रोखण्यासाठी आशा गट प्रवर्तकांचा मोठा रोल राहील.त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.असे ७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग द्वारे मुख्यमंत्री यांनी सांगितले.कोविड योद्धा म्हणून त्यांना शाबासकी दिली आणि तुमच्या कार्याला मुजरा करतो अशी स्तुती सुमने उधळली….मात्र मानधन वाढ,कोरोना भत्ता याबद्दल एक शब्द ही काढला नाही.आरोग्य मंत्री यांनी कृती समितीच्या शिष्ट मंडळा सोबत १० जून रोजी बैठक घेतली पण काहीही निर्णय दिला नाही.
म्हणून कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा,कोविड भत्ता प्रतिदिन आशा ना ३००रूपये व गट प्रवर्तकांना ५०० रु द्या,विना मोबदला काढून टाकण्याच्या धमक्या देऊन काम करून घेणे बंद करा,आशा व गतप्रवर्तकना कोविड संसर्ग झाल्यावर त्यांना प्राधान्याने सर्व सुरक्षा साहित्य द्या,मार्च पासून थकीत असलेले मानधन त्वरित वितरित करा.या व इतर अनेक प्रलंबित मागण्यासाठी हा संप होणार आहे.