Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसीलसमोर टरबूज टाकून शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसीलसमोर टरबूज टाकून शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

139

राजेश एन भांगे

 

बिलोली तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची इतर फळबाग शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे व कोरोना महामारी च्या संकटामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून टरबुज पिकाची या भागातील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत असतात.

पण या कोरोनाच्या महामारी संकटामुळे या टरबूजाकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नुकसानीचा फार मोठा फटका बसलेला आहे. एक टरबुजाचा नग तीन ते चार किलो असुन ते केवळ आठ ते दहा रुपयात विकावे लागते आहे.
याकडेही ग्राहक नसल्यामुळे नाईलाजास्तव शेतातील टरबूज शेतकऱ्यांना काढून फेकून देण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांना आलेली आहे. या टरबुजाची एकरी खर्च 70 ते 80 हजार असून ते खर्च केलेले पैसेही निघत नसल्याने या भागातील शेतकरी निराश झालेला असून, या निषेधात तहसील कार्यालय बिलोली समोर टरबूज टाकून अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला आहे.पहिलेच शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असून, त्यात टरबूज या पिकावर अमाप झालेला खर्च, व लगेच खरीप हंगामा जवळ आल्यामुळे परत खताचे भाव दुपटीने वाढल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.” जगाचा पोशिंदा माझा शेतकरी जगला पाहिजे” असे जर सरकारला वाटत असेल, तर मायबाप सरकारला हात जोडून विनंती की या भागातील टरबूज नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. अशी शेतकऱ्यांची मागणी या वेळी होती.

यावेळी बिलोली तहसीलदार ओम प्रकाश गौड यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी गजानन कोटलवार, माजिद शेख, शिवाजी शिंदे, लक्ष्मण फुलारी, विरनंद हायगले, दत्तात्रय पाटील शिंदे, सचिन पाटील ,राम पाटील दगडापुरकर, हनुमंत कामोळे गागलेगावकर, शंकर मोठे कार्लेकर असे अनेक शेतकरी या वेळी उपस्थित होते.