Home मराठवाडा सारथी तारादुतांचे संपूर्ण महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण

सारथी तारादुतांचे संपूर्ण महाराष्ट्रात लाक्षणिक उपोषण

299
0

तारादूत प्रकल्पावरील स्थगिती न उठवल्यामुळे ४८० सारथी तारादूत यांचे उपोषण

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था,सारथी कुणबी,मराठा या गटाच्या सामाजिक,शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आली.मात्र आज सारथी संस्था कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात असते.सारथीने सुरू केलेला तारादूत प्रकल्प सरकारी अधिकारी आणि सरकारच्या उदासीनतेमुळे बंद केला आहे.तो प्रकल्प चालू व्हावा,म्हणून अनेक वेळा आंदोलने केली गेली.आता मराठा आरक्षण कोर्टाने नाकारले.त्यामुळे सारथी तर सरकारच्या हातात आहे आणि तारादूत प्रकल्प तरी सुरू करण्यात यावा.यासाठी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले.दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूत सारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प आज रखडलेले आहे.त्यामुळे सारथी संस्थेच्या वेळकाढूपणा मुळे तारादूतांनवर उपासमारीची वेळ आली आहे.म्हणून महराष्ट्रातील ४८० तारादूतांनी आतापर्यंत तीन वेळेस आंदोलन केले.सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनते मुळे तारादूत पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे.

कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे घरूनच उपोषण करण्याचा निर्णय तारादूतांनी घेतला आहे.त्यामुळे महराष्ट्रातील ४८० तारादूत घरी बसून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत.सारथी संस्थेला दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की,सारथी संस्थेच्या (MOA) नुसार व संचालक मंडळाच्या २ मार्च २०१९ च्या बैठकीनुसार तारादुत प्रकल्प सुरू करण्यात आला.

परंतु या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली.त्यामुळे तारादूतांनी वेळोवेळी विचारणा केली असता चौकशीचा मुद्दा समोर केला जातो.गेल्या पंधरा महिन्यापासून सारथी संस्थेची चौकशी मुळे सारथी संस्थेमधील सर्वच प्रकल्प बंद केले आहे.त्यामुळे तारादूत यांना अकरा महिन्याच्या नियुक्त्या द्याव्यात अन्यथा कोविड संपल्यानंतर तारादूत आणि मराठा संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.