Home महाराष्ट्र यवतमाळ येथील शासकिय अध्यापक (बि. एड.) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन समारोह संपन्न.

यवतमाळ येथील शासकिय अध्यापक (बि. एड.) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन समारोह संपन्न.

322

घाटंजी (तालुका प्रतिनिधी) यवतमाळ येथिल शासकीय अध्यापक (बि. एड.) च्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थीचा ऑनलाईन स्नेह मिलन समारोह दीनांक 23/05/2021 रोजी संपन्न झाला . या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी मा. मनोज गाढवे यांनी केले .

स्नेह मिलन समारोह कार्यक्रमाचे निमित्ताने मा. मनोज गाढवे यांनी गुरुजनाप्रती आदर व्यक्त करून जुण्या आठवणीनां उजाळा देऊन एकमेकाचे ऋणानुबंध कायम राखण्यासाठी या ऑनलाईन स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट् केले .या कार्यक्रमास शै सत्र 2007-2008 च्या बॅच मधील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास तत्कालीन प्रा. डॉ. दिलीप चन्नावर , प्रा. डॉ. हेमलता तुरणकर , प्रा. डॉ. छाया महाले , प्रा. डॉ. सुवर्णा आठवले , डॉ. सुभाष धुळे , प्रा. गजानन कडु या मान्यवरानी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदिपक प्रगतीचे कौतुक केले. तसेच उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी माजी विद्यार्थी महेश भस्मे ,रविराज देशमुख , चंद्रकांत खोद्रे, प्रदिप वाघ , डॉ संदिप मसराम , अर्चना वैष्णव , देव शिंदे ,केतकी पाटील, मनोज गाढवे , पुनम बोडके, मंजु तखरे, सचिन उके, सचीन जाधव, शिला जमजाडे, कल्पना नवले , मोनाली देठे,प्रशांत वानखेडे, निलेश वायधने, अमोल गावंडे,सारिका तकोते, रवि कुमार शेळके,यांनी महाविद्यालयातुन जीवनात गगणभरारी घेऊन उंतुंग शिखरा पर्यत पोहण्याचे खरे ज्ञान मिळाल्याचे आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील प्राचार्या डॉ. सिमा लिंगायत यांनी या आयोजना बददल माजी विद्यार्थाचे कौतुक केले . तसेच जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडी अडचणीवर मात करीत यशस्वी वाटचाल करुन समाजात आदर्श निर्मान करावा. असा आशावाद या प्रसंगी अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केला .
या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी गजानन राऊत , नितीन सातव , प्रदिप बानाईत , बालाजी जाधव यांनी सहकार्य केले. तसेच तांत्रीक सहाय्य हर्षद हावडा यांनी तर मान्यवराचे स्वागत कु. पुष्पा वसावे यांनी केले. संचालन श्री अमरजीत कळसकर यांनी तर आभार श्री. महेश भस्मे यानी मानले.