
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी आणि घनसावंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष विष्णुपंत कंटुले यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनामुळे एक ध्येयवादी, निष्ठावंत नेता,सच्चा मित्र हरवला अशी प्रतिक्रिया कुंभार पिंपळगाव येथील पत्रकार संघाच्या शोकसभेत व्यक्त झाली.
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
स्वर्गीय विष्णुपंत कंटुले यांना पत्रकारांनी श्रद्धांजली वाहिली.यावेळी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विष्णुपंत कंटुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर च्यासह रामेश्वर लोया, तालुकाध्यक्ष किशोर शिंदे, पत्रकार लक्ष्मण बिलोरे, कौतिक घुमरे, संभाजी कांबळे, अभिषेक दुकानदार,आप्पासाहेब कंटुले,नारायण आनंदे,प्रल्हादनाना कंटुले, संतोष बोटे, मोहन मुंगसे आदिंची उपस्थिती होती.











































