Home विदर्भ वादळी पावसामुळे पेरणीपूर्व हंगामातील कामांना ब्रेक

वादळी पावसामुळे पेरणीपूर्व हंगामातील कामांना ब्रेक

156

ईकबाल शेख

वर्धा – वर्ध्यात चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे वर्धा जिल्हयात पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरू असतानाच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीची कामे खोळंबली आहे पावसाने उघडीप दिल्यानंतर मशागती सुरू होऊन नंतर पेरणी केली जाणार असल्याने खरीप पेरण्या लांबणीवर पडणार आहेत .

शेतकर्‍यांनी बियाणे व खतांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली असून कोरोनातील लाॅक डाऊनमुळे शेतीच्या कामात अडथळे निर्माण होताना दिसत आहेत.
मे महिना संपत येत असुन रोहीणी नक्षत्र काहि दिवसावर येवुन ठेपल्याने शेतकर्‍यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले आहे पंधरा विस दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना पेरणीपूर्व मशागती करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यामुळे शिवारात शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली हाेती मात्र अरबी समुद्रात सुरू झालेल्या ताैउते. चक्रीवादळामुळे वातावरण बदल झाल्याने पेरणी पूर्ण मशागतींना ब्रेक लागला आहे
चक्रीवादळामुळे सर्वत्र पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला असून शेतीची कामेही खोळंबली आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला नांगरणी, व्हिपास, फंटन अशी पहिल्या वाहिची कामे झाली असली तरी सध्या पेरणीच्या पाश्र्वभूमीवर काही शेतकर्‍यांच्या शेतातीची दुसरीवाही जसे वखरण, रोटावेटर, सरी काढण्याचे काम शेतकर्‍यांनी सुरू केले होते मात्र पावसामुळे ही कामे थांबली आहेत मशागतींच्या कामासोबतच शेतकर्‍यांनी बियाणे व खतांची जुळवाजुळव सुरू केली आहे कोरोनामुळे बाजारपेठांत निर्बंध आहे मात्र शेतीच्या कामासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे शेतीसंबंधीत दुकाने सुरू असल्याने शेतकरी दुकानांवर गर्दी करीत आहेत.
कोरोना व लाॅकडाउनची स्थिती असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. शेतीची कामे कशी पूर्ण करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे कोरोनामुळे मजूर मिळण्याची पंचाईत झाली असून बी बियाण्यांचाहि तुटवडा पडण्याची शक्यता आहे कृषी विभागाने खरिपाच्या पेरण्या संदर्भात योग्य नियोजन केले असले तरी पण त्याची अंमलबजावणी कितपत होते हे महत्त्वाचे ठरणार आहेत योग्य पध्दतीने नियोजन न झाल्यास आधीच कोरोना, लाॅकडाऊन त्यातच खरीप वाया गेला तर शेतकर्‍यांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.

हंगाम वाचविण्याचे मोठे आव्हान
वर्ध्यात परिसरात रोहिणी नक्षत्र लागताच काहि शेतकर्‍यांकडुन मान्सूनपूर्व धुरळ पेरणीला सुरुवात केली जाते मात्र अवकाळी पावसानंतर थोड्यात कालावधीत वादळी पावसाने सुरुवात केल्याने येथील शेतकर्‍यांच्या पेरणीपूर्व मशागती थांबल्या आहेत त्यातच वादळी पावसाला धरुनच मान्सून सुरू झाल्यास येथील पेरण्यांची परिस्थिती अवघड होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे एकूणच शेतकरी व कृषी विभागापुढे खरीप हंगाम वाचवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.