Home मराठवाडा वैद्यकिय शिक्षणमंत्री ना.अमित देशमुखानी घेतली डॉ. राहूल पवार यांच्या प्रकृतीची दखल.

वैद्यकिय शिक्षणमंत्री ना.अमित देशमुखानी घेतली डॉ. राहूल पवार यांच्या प्रकृतीची दखल.

331

आवश्यक ती सर्व मदत करण्याचे वैदयकीय शिक्षण विभागाला निर्देश

औरंगाबाद  , ( बालाजी सिलमवार) , दि.  २२ – औरंगाबाद येथील एमजीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या इंटर्न डॉ. राहूल पवार यांच्या प्रकृती विशषी तसेच त्याच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारा संबंधी राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज शुक्रवार दि. २१ मे रोजी माहीती करून घेतली. या उपचाराच्या संदर्भाने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे त्यांनी रूग्णालय प्रशासनाला सांगितले असून तसे निर्देशही वैदयकीय शिक्षण विभागाला दिले आहेत.

  डॉ. राहूल पवार यांचे एमआयएमएसआर या लातूर येथील खाजगी वैदयकीय महाविदयालयात शिक्षण पूर्ण झाले असून तेथेच तो इंटर्नशीप करीत आहे. या दरम्यान त्याला कोवीड१९ ची लागण झाली उपचारा दरम्यान म्युकरमाईकोसीस या आजाराचा संसर्ग झाला आहे. सदया औरंगाबाद येथे एमजीएम रूग्णालयात त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत.

  डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचार आणि त्यांच्या आईवडीलांच्या आर्थिक परिस्थिती विषयी वृतपत्रातून बातमी प्रसिध्द झाली आहे. त्याची तातडीने दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातून एमजीएम रूग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. डॉ. राहूल यांची प्रकृती तसेच त्यांच्यावरील उपचाराविषयी माहिती घेऊन ती नामदार अमित देशमुख यांना अवगत करण्यात आली.

  एमआयएमएसआर वैदयकीय महाविदयालय, एमजीएम रूग्णालय तसेच इतर काही मंडळी डॉ. राहूल पवार यांच्या वरील उपचारासाठी मदत करीत असून वैदयकीय शिक्षणमंत्री ना. अमित देशमुख यांनीही वैदयकीय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. चंदनवाले यांना एमजीएम रूग्णालयाच्या संपर्कात राहून डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर डॉ. राहूल पवार यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल व ते वैदयकीय सेवेत रूजू होतील अशा सदभावनाही ना. देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत.