Home मराठवाडा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विष्णुपंत कंटुले यांचे निधन

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विष्णुपंत कंटुले यांचे निधन

568
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी काँग्रेस पक्षाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष विष्णुपंत सदाशिवराव कंटुले यांचे आज बुधवारी, दुपारी औरंगाबादमध्ये एका रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ५४ वर्षे होते.सत्ता असो नसो विष्णुपंत कंटुले काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. अत्यंत शांत,संयमी आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व, राजकीय जीवनात वैचारिक भूमिका सोबत कुठलीही तडजोड न करणारे व्यक्तिमत्व गावाने गमावले आहे. त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. महीनाभराच्या संघर्षानंतर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.राजकिय , सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

प्रतिक्रिया

१) आमचे परममित्र काॅग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णुपंत (काका) कंटूले यांचे आज दुर्दैवी निधन झाले बातमी एकूण खूप धक्का बसला..त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.काही ही असो त्यांनी आपली वैचारिक भूमिका कधीही सोडली नाही.असा कट्टर आणि वैचारिक राजकीय, सामाजिक जीवनात सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या,नेहमी शेतकरी कामगारांच्या आंदोलनास पाठींबा देणाऱ्या नेत्याला आपण मुकलो त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
– गोविंद आर्दड,माकप घनसावंगी
————————-

१) काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बांधिलकी ठेवून अविरतपणे मागच्या वीस वर्षांपासून या पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी ज्यांनी अविरत कष्ट घेतले असे तालुक्यातील या पक्षाचे नेते तालुका अध्यक्ष सन्माननीय विष्णुपंत कंटुले यांचे अकाली निधन झाले . एक संयमी सुस्वभावी आणि सुसंस्कृत नेते अशी त्यांची सर्वदूर ओळख होती त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाला अनुसरून सक्रियपणे पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी अविरतपणे कार्यरत राहिले धार्मिक वृत्तीचे शांत, संयमी असा एका जीवनाचा प्रवास आता थांबला आहे हजारो मैलाचा प्रवास एका पावलाने चालू होतो ,त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे त्यांची घोडदौड चालू होती तालुक्यात सर्वांच्या सुख दुःखा मध्ये नेहमीच सहभागी झालेले असे ते कार्यकर्ते होते, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंब शोक सागरात बुडाले आहे धार्मिक कार्यक्रमात योगदान असलेले सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले विष्णुपंत कंटुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
-रामेश्वर लोया
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते