Home विदर्भ धामणगांव रेल्वे तालुक्यातील रेती घाटात यांत्रिक पद्धतीने रेती उत्कखन

धामणगांव रेल्वे तालुक्यातील रेती घाटात यांत्रिक पद्धतीने रेती उत्कखन

255

प्रशांत नाईक

अमरावती – धामणगांव रेल्वे तालुक्यातील दिघी (महल्ले )रेती घाटातून अवैध पद्धतीने व यांत्रिक पद्धतीने रेती उपसा होतं असून त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे, संबंधित प्रकरणाची तक्रार शेतकरी संघटनेचे नेते -ऍड. चेतन परडखे यांना मिळताच त्यांनी कार्यकर्ते सोबत सदर घाटाची पाहणी करण्याकरिता गेले असता, तिथे चालू असलेल्या पोकल्याण्ड, बोटीच्या साहाय्याने रेती उपसा चालू होता.

सदर ची माहिती मंडळ अधिकारी, तलाठी यांना देण्यात आली, मौका पाहणी करीता आलेले तलाठी चौकशी न करता निघून गेलेत,करीता संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी वर कडक कार्यवाही करण्याची व पाठीशी असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते, ऍड. चेतन परडखे यांनी केली आहे यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्ते दिनेश वाघमारे,वैभव महल्ले, अनेक आधी कार्यकर्ते उपस्थित होते.