Home विदर्भ एक मदतीचा हात भव्य रक्त दान शिबिरात , “घाटंजी येथे रक्तदान शिबिराचे...

एक मदतीचा हात भव्य रक्त दान शिबिरात , “घाटंजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन”

64
0

यवतमाळ / घाटंजी :-  सध्याच्या काळात तालुका व संपूर्ण राज्य कोरोना आजाराने ग्रासलेले आहे.शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.तसेच शासनाच्या वतीने १८ वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे त्या मोहीमेचा सर्वांनी लाभ घ्यावाच परंतू लसीकरण झाल्यानंतर आपण काही कालावधी रक्तदान करू शकत नसल्याने भविष्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोरोना महामारीच्या काळात‌आपण सर्वजन स्वत:च्या परीने कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहोतच त्याच सोबत सामाजिक कर्तव्याची जान ठेवून गरजूंकरीता रक्तदान करण्याकरीता सर्व युवा वर्गाने पुढाकार घ्यावा.शासनाला एक मदतीचा हात म्हणून *मा. प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर  यांच्या वाढदिवसा निमित्य  वंचित बहुजन आघाडी,घाटंजी* च्या वतीने दि.१०/०५/२०२१ रोजी घाटंजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिर कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात येईल.
हे शिबिर स्वं.श्री.दादाजी ढगले कॉम्प्लेक्स जलाराम मंदिर जवळ मेन रोड घाटंजी येथे आयोजित असून वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे. चला सर्व घाटंजीकर रक्त डोनेट करू मानवतेला प्रमोट करू या शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यानी संघपाल कांबळे 9423653177/
मनोजभाऊ ढगले 9011823202/राजुभाऊ चव्हाण 9420309064/मोरेश्वर भाऊ वातीले 7798039149/अहेतश्याम पठाण 8378868735/सीताराम वाघ 9527251925/युवराजभाऊ आडे 8975171734/पद्ममाताई खोब्रागडे 9405707807/अर्चनाताई तुरे 8888754538/मनीषभाऊ मस्के 9422392730 यांच्याशी संपर्क करून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून गरजूंना सहकार्य करावे असे आवाहन संघपाल काम कांबळे यांनी केले आहे.