Home जळगाव चिनावल येथे जवळपास २ महीन्या पासून गावातील १६ पथदिवे बंदच; दुरुस्त करून...

चिनावल येथे जवळपास २ महीन्या पासून गावातील १६ पथदिवे बंदच; दुरुस्त करून देण्याची ग्रामस्थांची मांगणी…

280

रावेर (शरीफ शेख)

रावेर तालुक्यातील चिनावल येथील प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील एकूण १६ पथदिवे जवळपास दोन महिन्या पासून बंद आहेत. त्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना आता शेवटच्या टप्प्यात आला आला परंतु प्रभाग क्रमांक ४ व ५ मध्ये ग्रामपंचायत मार्फत लाईटची व्यवस्था करण्यात आली नाही. आता येथील नागरिक “आम्ही थकलो हो दादा” असं म्हणताना दिसत आहेत.
आज येथील युवकांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग ४ व ५ मध्ये २ महीने झाले १६ लाईट दोन महीन्या पासून बंद आहे ग्रामपंचायत मध्ये तोंडी व लेखी तक्रार देऊन देऊन थकलो असून पुढे नागरिकांना कीती त्रास सहन करावा याची ग्रामपंचायतला माहीती आहे का? कित्येक वेळा ग्रामपंचायतमधे तोंडी तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत याची दखल घेत नाही. “ग्रामपंचायत मध्ये खांबावर चढणारा माणूस नाही आहे त्याला कोरोना झाला आहे ते १४ दिवस क्वारंटाईन आहे ,अजून ८ दिवस ललागतील अशी उडवाउडवीची उत्तरे ग्रामपंचायत मार्फत देण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे
जर खांबावर चढणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाला आहे तर तालूक्यात खांबावर चढणारा दूसरा माणूस नाही का ? असा प्रश्न निवेदन कर्त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदन देताना रीयाज़ शेख, सईद खान, शेख जुलेबीन, अहेसान शेख, नावीद शेख उपस्थित होते.