Home जळगाव कहेकशा परवीन एमबीबीएस उत्तीर्ण – मानियार बिरादरी च्या कोविड सेंटरला भेट व...

कहेकशा परवीन एमबीबीएस उत्तीर्ण – मानियार बिरादरी च्या कोविड सेंटरला भेट व सत्कार

103
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव शहरातील मेहरून भागातील रहिवासी व जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे एम बी बी एस चे शिक्षण घेणारी कहेकशा परवीन विकार अहेमद ही एम बी बी एस ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होताच तिने औरंगाबाद हुन येऊन मानियार बिरादरी च्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ला भेट देऊन रुग्णांची पाहणी करून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

यावेळी बिरादरीचे अध्यक्ष तथा हॉस्पिटल चे मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तिचे वडील विकार अहेमद, कोविड सेंटर चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियाज बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एजाज खान , डॉ मोहसीन शेख, व्यवस्थापक रइस शेख आदी उपस्थित होते.
कहेकशा परवीन ही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त मेडिकल स्टोर इन्चार्ज सगीर अहमद यांची नात असून, के परविन मेडिकल स्टोर चे संचालक विकार अहमद( गुड्डू) यांची मुलगी आहे तर डे नाईट मेडिकल स्टोर चे संचालक इफ्तेखार अहेमद(समी) यांची पुतणी आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.