Home महत्वाची बातमी लाडक्या मुलाच्या मृत्यू चा धक्का सहन झाला नाही माता पित्याने ही त्यागले...

लाडक्या मुलाच्या मृत्यू चा धक्का सहन झाला नाही माता पित्याने ही त्यागले प्राण ,

859

 

वाह रे आई बाबा  ???

 

अमीन शाह

कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई – वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे . या घटनेत दिवंगत प्राध्यापक संजय नवले यांचे वडील माणिकराव ( माजी शिक्षण अधिकारी , ८० ) व आई मंदाकिनी ( ७८ ) हे मृत्यू पावले आहेत . दोघांचा मृत्यू शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना झाला . त्यांच्यावर आज सकाळी धनकवडी , पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .
घटनेची अधिक माहिती अशी की , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले ( वय ५५ ) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले . मुळचे चोराखळी ( ता.कळंब , जि.उस्मानाबाद ) येथील ते रहिवाशी होते . त्यांच्यावर त्याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले . अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई – वडिलांना लाडक्या मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला . अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . मात्र , उपचार सुरू असतांना माणिकराव तात्याबा नवले ( माजी शिक्षण अधिकारी , ८० ) यांचे  सायकांळी ५ निधन झाले . तर दोन तासातच पत्नी मंदाकिनी माणिकराव नवले ( ७८ ) यांनीही प्राण सोडला . पुत्रवियोगाचा धक्का बसल्याने अंथरुणाला खिळलेल्या या दोघांचीही प्राणज्योत मालवली . या दांपत्यावर आज सकाळी धनकवडी , पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात प्रा.अरविंद ( शिवाजी महाविद्यालय , उदगीर ) व सुनील ( पुणे ) ही दोन मुले , मुलगी व नातवंडे असा परिवार आहे . या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे ,