Home महत्वाची बातमी सीएए व एनआरसी विरोधात उद्या शेगावात धरणे

सीएए व एनआरसी विरोधात उद्या शेगावात धरणे

9
0

तहाफ्फुज ए शरियत आणि संविधान बचाव संघर्ष समिती व इतर राजकीय पक्षांचे आयोजन…!

अमीन शाह

शेगाव , दि. १९ :- देशात लागू करण्यात आलेला सीएए आणि अंमलबजावणीची तयारी करण्यात येणाऱ्या एनआरसी या कायद्याच्या विरोधात तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती, व इतर राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेगावात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने सुरु झाली. या आंदोलनांचे सत्र अजूनही सुरुच आहे. दरम्यान,सोमवारी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजे पासून ४ वाजे पर्यंत तहाफ्फुज ए शरियत, संविधान बचाव समिती आणि शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेगावात एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात शहरातून ५०० च्या जवळपास नागरिक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या साठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तहाफ्फुज ए शरियत कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती, व इतर राजकीय पक्षांकडून कडून करण्यात आले आहे.