Home महाराष्ट्र मिस्टर इंडिया मराठमोळा बॉडी बिल्डर जगदीश लाडचं करोनामुळे निधन

मिस्टर इंडिया मराठमोळा बॉडी बिल्डर जगदीश लाडचं करोनामुळे निधन

762

दुःखद घटना ,

 

अमीन शाह

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला असून दैनंदिन रुग्णसंख्ये सोबत मृतांची संख्याही उच्चांक गाठत असून चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र अद्यापही अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून करोना आपणास होणार नाही अशा गैरसमजात तुम्ही असल तर तुम्ही जरा थांबा…कारण ही बातमी वाचून तुम्हीदेखील खडबडून जागे व्हाल.
कारण मराठमोळा बॉडीबिल्डर ” जगदीश लाड” याचं नुकतंच करोनामुळे निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.

मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती. जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

करोनाची लागण झाल्यानंत जगदीश लाड उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचं निधन झालं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
तर तुम्ही जगदीश लाड पेक्षा तंदुरुस्त आहात काय ? याचा विचार नक्की करा माँस्क वापरा हात स्वच्छ धुवून, अनावश्यक गर्दीत जाने टाळा, शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा, स्वस्थ जीवन जगा. सर सलामत तो पगडी हजार या म्हनीचा भावार्थ समजुन वागा.