
हमीद तडवी
यावल तालुक्यात यावल शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या राहत्या घरी ओढनीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

तर दुसरी आत्महत्या यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेतमजुराने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने यावल पोलिस स्टेशनमधे या घटनांची अकस्मात मृत्युंची नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, यावल शहरातील श्रीराम नगर परिसरातील कन्हैया रामचंद्र मेढे वय २६ वर्ष या तरुणाने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयाञा संपवली तर डोंगर कठोरा येथील रहिवाशी भरत जनार्दन सनग याने देखील त्याची जीवनयाञा संपवल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनांचे मृत्यूचे कारण अद्याप समजु शकले नाही.तरी सदरील प्रकरणाची माहिती गोकुळ मेढे यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे.मयत तरुणांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय यावल मधून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.सदर घटनांचा तपास यावल पोलिस निरीक्षक डॉ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स फौ नितीन चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत











































