Home विदर्भ भिष्णुर शिवारात रानडुकराचा दोन शेतमजुरावर हल्ला

भिष्णुर शिवारात रानडुकराचा दोन शेतमजुरावर हल्ला

263
0

एक गंभीर जखमी एक सुदैवाने बचावला

वर्धा /  तळेगांव (शा.पं.) : – नजीकच्या चिस्तुर येथील एका शेतकर्‍याच्या शेतातील धुर्‍यांवरील झुडुपे तोडत असतांना दोन शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केल्याची घटना नजीकच्या भिष्णुर फाट्या जवळील शिवारात गुरुवारी सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान घडली असून या हल्ल्यात एक शेतमजुर गंभीर जखमी झाला असुन दुसरा सुदैवाने बचावला आहे. त्याला उपचारासाठी नागरिकांनी आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रानडुक्करांचा उपद्रव परिसरात मोठ्या प्रमाणात असुन त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर पारिसे अंदाजे वय ३८, व मोतीराम पारीसे दोघेहि रा. चिस्तुर हे शेतकरी विठ्ठलराव दहेकर यांचे शेतात काम करण्याकरिता मजुरीने गेले होते. शेतात धुरे साफ सफाई व झुडुपे तोडत असतांना असताना गुरुवारला सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला असून त्यात ज्ञानेश्वर पारीसे हा गंभीर जखमी झाला असुन उजव्या पायला तिन ठिकानी चिरले अाहे तर मोतीराम पारीसे यांना धडक बसुन ते खाली पडल्याने ते सुदैवाने बचावले. गंभीर जखमीला उपचारासाठी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने शेतमालकाने आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परिसरात असलेल्या शेत शिवारात रानडुक्करांचे वास्तव्य असुन शेतातील उन्हाळी पिकावर ताव मारण्याकरीता येत असल्याने याचा परिसरातील शेतकर्‍यांना मोठा त्रास होत आहे. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या घटनेची तक्रार व माहिती वन विभागाकडे व तलाठ्याकडे देण्यात आल्याचे समजते. सध्यास्थितीत सुरु असलेल्या कोरोना संसर्गामुळे आधीच अडचनीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या संकटामध्ये वाढ होतांना दिसत आहे. तेव्हा संबंधीत विभागाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक पावले उचलुन जखमी शेतमजुराला तात्काळ मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.