Home विदर्भ दिग्रस विधानसभेत कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन काँसंट्रेटर , “आमदार संजय राठोड यांचा पुढाकार”

दिग्रस विधानसभेत कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन काँसंट्रेटर , “आमदार संजय राठोड यांचा पुढाकार”

250

यवतमाळ – दिग्रस विधानसभेतील दारव्हा,दिग्रस व नेर तालुक्यासाठी आमदार संजय राठोड यांनी आज ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून दिले.जे कोविड रुग्ण घरगुती उपचार घेत आहेत व ज्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास होत आहेत सेच ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ही 90 चे खाली जात आहे अशा रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होई पर्यंत हे ऑक्सिजन काँसंट्रेटर मोठ्या फायद्याचे ठरणार आहेत.

कोविड रोगामध्ये अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊन तो रुग्ण गंभीर होतो व जर अशा रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास त्या रुग्णाच्या शरीरातील कार्यप्रणालीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.सध्या यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढल्याने रुग्णालयात देखील ऑक्सिजन बेड लवकर उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णाची स्थिती खालावते व अनेक रुग्ण उशिरा वैद्यकीय मदत व ऑक्सिजन मिळाल्याने दगावत आहेत.नेमकी हीच बाब दिग्रस विधानसभेचे आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांचे लक्षात आली व अशा रुग्णांसाठी त्यांनी स्वखर्चातून ऑक्सिजन काँसंट्रेटर दारव्हा,दिग्रस व नेर येथे उपलब्ध करून दिले आहेत.
मागील कोरोना लाटेत देखील आमदार संजय राठोड यांनी दारव्हा,दिग्रस व नेर येथे मास्क,सॅनीटायझर,गरजूंना मोफत भोजन व्यवस्था तसेच दिग्रस विधानसभेतील बाहेर राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आर्थिक मदत असे उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून राबविले होते.
ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन मिळविणे साठी व कोविड बाबत रुग्णांना मदत मिळवून देणे करीत दारव्हा,दिग्रस व नेर येथील आमदार संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालय येथे मदत केंद्र स्थापन केले असून गरजूंनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा.दिग्रस येथे उत्तममामा ठवकर,संजीव चोपडे,अजिंक्य म्हात्रे,अमोल राठोड,केतन रत्नपारखी,दारव्हा येथे मनोज सिंगी,राजू दुधे,बंदुभाऊ काणे तर नेर येथे मनोज नाल्हे,दीपक आडे आणि राजू ढोकणे किंवा हया तिन्ही तालुक्यात व विधानसभा मतदार संघात शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचेशी रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईकांनी संपर्क करावा असे आवाहन शिवसेना व आमदार संजय राठोड मित्र परिवार दिग्रस विधानसभा यांनी केले आहे.हया प्रसंगी आमदार संजय राठोड व शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

आवश्यकते अनुसार ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून देणार

कोविड रुग्णासाठी वैद्यकीय मदत उपलब्ध होई पर्यंत ऑक्सिजन काँसंट्रेटर फायद्याचे ठरत आहे.त्यामुळे अनेक रुग्ण गंभीर होण्यापासून वाचणार आहेत.ऑक्सिजन काँसंट्रेटर हे नवीन उपकरण असून त्याची मोठ्या प्रमाणात आज मागणी आहे.पण दिग्रस विधानसभेत व यवतमाळ जिल्ह्यात आवश्यकते अनुसार हे उपकरण आपण उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजय राठोड यांनी सांगितले.