Home विदर्भ लॉकडाऊन मध्ये महागाई भडकली. सामान्य जनता हैराण…!

लॉकडाऊन मध्ये महागाई भडकली. सामान्य जनता हैराण…!

291

लॉकडाऊन व महागाईचा अधिक फटका सर्वसामान्यांना

प्रा. मो.शोएबोद्दीन

अकोला / आलेगाव –  दि २९ :- जागतिक महामारी कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तुटावी या अनुषंगाने शासनाने राज्यात लॉक डाऊन सुरू केले.दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे दर आकाशाला जाऊन भिडल्याने किंबहुना भिडविल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे.अनेक कुटुंबांकडे परिस्थिती अभावी उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसून येत आहे.लॉक डाऊनचा फायदा घेत अनेक व्यापारी वस्तूंचा तुटवडा या निमित्ताने वाढीव दर घेऊन जनतेची लूट करीत असल्याचे आरोप जनते मधून होत आहेत.तरी या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.तसेच शासनाने शेतकरी,निराधार,शेतमजूर,व गोरगरिबांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत जमा करावी जेणे करून लॉक डाऊन मध्ये सर्व सामान्यांना सोयीचे जीवन जगता येईल.

जागतिक कोरोना महामारी आजाराचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे,सदर आजाराची शृंखला तुटावी म्हणून शासनाने गेल्या काही दिवसां पासून लॉक डाऊन सुरू केले.सदरच्या लॉक डाऊन मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला व्यापाऱ्यां कडून योग्य भाव मिळत नसला तरी सदर माल व्यापाऱ्यां कडे गेल्या नंतर ग्राहकां पर्यन्त मात्र दामदुपट्टीने विकला जात आहे.तसेच लॉक डाऊन पूर्वी खाते तेलाचे दर किलोला ८५ रुपये होता तोच दर आता किलोला १५० रुपये झाला आहे.एकंदरीत दैनंदिन लागणाऱ्या प्रत्तेक वस्तूंचे दर वाढल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे.अनेक छोटे उद्योग धंदे ठप्प पडल्याने मजुरांची मोठी वाताहत होत असून अनेकांवर उपास मारीची वेळ आल्याचे चित्र दिसून येत आहे.तसेच आलेगावामध्ये असलेल्या आठ खासगी दवाखान्यामध्ये रुगणांची वाढती संख्या असून सर्व दवाखाने फुल्ल आहेत अनेक मजुरांच्या घरामध्ये आजारी पडलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी पैसाच नसल्याने उधार उसनवारी करून उपचार सुरू असल्याचे अनेकांनी सांगितले.कोरोनाच्या लाटेने ग्रामीण भागामध्ये थैमान घातल्याने,व प्रत्तेक गावामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अशा गंभीर परिस्थिती मध्ये कुणी कुणाला धीर देण्यासाठी पुढे येतांना दिसत नाही.एकीकडे कोरोना आजाराची भीती तर दुसरीकडे वाढलेल्या महागाईचा तडका सामान्य जनतेला सोसण्या पलीकडचा ठरत आहे.तरी जिल्हा प्रशासनाने दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे दर नियंत्रणात कसे राहतील या कडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.तसेच शासनाने शेतकरी,शेतमजूर,निराधार,कामगार,आदींच्या बँक खात्या मध्ये आर्थिक मदत जमा करावी अशी मागणी होत आहे.